
वेंगुर्ला : श्री देव ब्राम्हण नवरात्रौत्सव मंडळ रेडी म्हारतळेवाडी यांच्या झालेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात युगंधरा झिलू भगत यांनी पैठणी पटकावली तर उपविजेत्या प्रिती प्रशांत जोशी यांना पैठणी व तृतीय क्रमांक विधि विनायक राणे हिला साडी देण्यात आली. ही स्पर्धा सुनिता सुधीर पाटील व म्हापणकर कुटुंबिय रेडी यांनी पुरस्कृत केली होती.
या स्पर्धेत एकुण 30 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. खेळ पैठणीचा संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. रुपेश पाटील आणि त्रिंबक आजगावकर यांनी यशस्वीपणे पार केले. या स्पर्धेत सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या. स्पर्धेचे बक्षीस वितरण पुरस्कर्ते म्हापणकर कुटुंबिय यांच्या हस्ते करण्यात आले.